शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईतील तब्बल ३० हजार सीम कार्डस बंद; दूरसंचार विभागाची मोठी कारवाई

by Gautam Sancheti
मे 17, 2023 | 5:24 pm
in राष्ट्रीय
0
sim card

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई मधील तब्बल ३० हजारापेक्षा जास्त सीम कार्ड बंद करण्यात आले आहेत. दूरसंचार सेवा प्रदाते – TSP यांनी ही कारवाई केली आहे. सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसएने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या आणि ही कारवाई केली आहे.

दूरसंचार विभागाने ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. ज्यातून त्यांना ६२ समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत. एका समूहात, असे ५० ग्राहक असण्याची मर्यादा आहे, मात्र असे असूनही, या ६२ समूहांमध्ये एकूण ८,२४७ ग्राहक आढळले. याचाच अर्थ, यात पॉइंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते, असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिम कार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते.

एका प्रकरणात तर, एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला ६८४ वेगवेगळे मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संचार साथी पोर्टलचे उद्‌घाटन केले. या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी या पोर्टल बद्दल तसेच एएसटीआर अस्त्र या चेहेऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, एच. एस. जाखड यांनी ही माहिती दिली . यावेळी नंदलाल सचदेव, उप महा संचालक (ए अँड एचआर), किशोर एक्का, उपमहासंचालक, सुरक्षा, अजय कमल, उप महा संचालक – तंत्रज्ञान हे अधिकारी उपस्थित होते.

दूरसंचार विभागाने, बनावट सिम कार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR – अस्त्र यात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट/खोट्या मोबाइल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे या दृष्टीकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे, दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले. ह्या प्रणालीअंतर्गत, ग्राहकांचे छायाचित्र आणि त्यांची माहिती यांची तुलना केली जाते, आणि त्यातून मिळणारी माहिती, वेगवेगळ्या नावांच्या त्याच छायाचित्राच्या महितीशी पडताळून पाहिली जाते.

बनावट/खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाइल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात. आणि अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात, की त्यांनी, अशी बनावट ओळखपत्रे, निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने, असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत, अशा बनावट- खोट्या सीम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

या संदर्भात, मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशन, व्हीपी मार्ग पोलिस स्टेशन, डीबी मार्ग पोलिस स्टेशन, डीएन नगर पोलिस स्टेशन, सहार पोलिस स्टेशन, बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कारवाईमुले, मुंबईतील सायबर गुन्ह्यांसह विविध बेकायदेशीर कामांसाठी अशा बनावट/बनावट, नॉन-बोनाफाईड मोबाईल कनेक्शनचा वापर रोखण्यास मदत मिळू शकेल.

Mumbai 30 Thousand Sim Cards Closed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कामगारनगरला १७ वर्षीय मुलास बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई… तब्बल २.२३ कोटीचे सोने जप्त; प्रवाशांकडे येथे सापडले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जरांगे पाटील आंदोलनाला बसताच सरकारचा मोठा निर्णय…सुरु आहे या घडामोडी

ऑगस्ट 29, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याही सुविधा नाही…रोहित पवार यांचा गंभीर आरोप

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250828 WA0508 e1756433976745
इतर

चेन्नई क्रिकेट दौऱ्यासाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्राचा कर्णधार…समकित सुराणा देखील संघात

ऑगस्ट 29, 2025
amol khatal
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला…राजकीय वातावरण तापले

ऑगस्ट 29, 2025
Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
WhatsAppImage2023 05 16at7.01.08PM2SNDH e1684312625138

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई... तब्बल २.२३ कोटीचे सोने जप्त; प्रवाशांकडे येथे सापडले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011