मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMI) अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली. या संदर्भात प्रवाशाकडे सविस्तर चौकशी केली असता, भारतात तस्करी करण्यासाठी आपण अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचे कबूल केले.
या प्रवाशाला नंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण ६५ कॅप्सूल, ज्याची किंमत ७.८५ कोटी रुपये आहे, त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यात आल्या आणि गुरुवारी (१० ऑगस्ट २०२३) एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलमानुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.
Cocaine worth over Rs 7.85 crore seized in Mumbai, Ugandan passenger arrested
Mumabi International Airport cocaine Seized DRI