पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दौंड तालुक्यातील दहिटणे या गावी १९९७ पासून ओसाड उजाड माळरानावर बाळासाहेब पिलाणे यांनी घेतलेली मेहनतीच रूपांतर 2018 मध्ये मुलुख फार्मच्या रूपाने अस्तित्वात आले. पुण्यामधील प्राध्यापकाची नोकरी सांभाळून रोज ८० किमी. प्रवास दुचाकीवर करत असताना दगड, काट्याकुट्यानी भरलेलं माळरान टप्याटप्याने फळबागेत रूपांतर केलं, त्याच बरोबर असंख्य देशी झाडे लावली. एक कोटी लिटर क्षमता असलेलं शेततळ्याची उभारणी केली. पूर्ण शेत तळ रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने भरलं जात आणि उन्हाळ्यामध्ये सायपण पद्धतीने शेतीस पाणी वापरलं जाते. या शेत तळ्यामध्ये वाहून आलेल्या कासवांचं नैसर्गिकरीत्या संगोपन केलं जातं नि त्या भोवती असलेल्या शेतीसाठी उपयोगी नसलेल्या जागेत मुलुख फार्म या कृषि पर्यटनाची उभारणी केली.
ही प्रक्रिया चालू असतानाच कोरोना सारख्या महामारी मध्ये सर्व जग सापडले. व्यवसायाच्या सुरवातीचा उभारीच्याच काळात कोरोणा मुळे सर्व उध्वस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच पहिली लाट, दुसरी लाट मध्ये लोकांचे मानसिक आर्थिक कंबरडे मोडलेल असताना लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील का ही आशाच संपुष्टात आली होती. पण हार मानून चालणार नव्हतं. या महामारीच्या काळात पुनर्विचार करण्यासाठी भरपूर वेळ होता. आणि स्वतः आपलं कुटुंब कोरोणा काळात कश्या प्रकारे मुलुख फार्म मुळे सुरक्षित राहिलं तसेच आर्थिक ताण सोडता मानसिक ताण आला नाही हा अडचणीचा संपूर्ण काळ झाडात मध्ये पशुपक्ष्यांच्या सानिध्यात गेला. थोडक्यात निसर्गात राहिल्यामुळे मनाला उभारी मिळाली. या काळात खूप सारी देशी झाड लावली शेत तळ्यामध्ये नैसर्गिकपणे आलेल्या कासवांचं संगोपन केलं व नैसर्गिकरीत्या जैवविधता जपण्याचा प्रयत्न केला. खूप सारी पुस्तक जमवली, वाचन केलं यातून कधीच मानसिक ताण आला नाही. कोरोणा नंतर पुढे काय हा प्रश्न सतावत असताना कोरोणा काळात जे आपण अनुभवलं, निसर्गाच्या जवळ जाता आलं तेच पर्यटकांना आपण देण्याचा प्रयत्न केला.शेत तळ्यावर येणाऱ्या विविध पक्षांनी कडूलिंबाच बन उभ केलं.
पर्यटकांसाठी विविध देशी खेळ, महाराष्ट्रीयन पद्धतीचं रुचकर जेवण, अभ्यासपूर्ण शिवार फेरी, बैलगाडी फेरी ट्रॅक्टर सफारी, स्विमिंग पूल सिझन नुसार स्वतःच्या हाताने फळे भाजीपाला तोडण्याचा आनंद लुटणे. हजारो वर्ष जुन्या दगडांवर बसून योगा करणे तसेच पावसाळ्यामध्ये रानफुलं मोहत्सव असेल विविध भारतीय पारंपरिक सण साजरे करणे. हिवाळ्यामध्ये हुरडा पार्टी आयोजित करणे, उन्हाळ्यामध्ये आमरस पार्टीच आयोजन मुलांसाठी उन्हाळी शिबिरे घेणं. मुलुख फार्म मध्ये असणारे असंख्य झाडाचे पानांचे, फांध्याचे वेगवेगळे आवाज. वेगवेगळ्या पक्षांची किलबिल याचा अनुभव पर्यटकांना देणे. ज्याप्रकारे आपल्या देशाला, राज्याला जसा एक इतिहास असतो तसाच इतिहास आपल्या भवताल ला ही असतो तो इतिहास, ती जैवविविधता मुलुख फर्मच्या रूपाने पर्यटकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असतो. मुलुख फर्माच्य सर्व व्यापामध्ये पूर्ण कुटुंब सहभागी असते. बाळासाहेब पिलाणे त्यांच्या पत्नी संजना पिलाणे मुलगा कृषिराज व सागर तसेच दोन्ही सूना आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतात.
मुलुख फार्म आता कृषि पर्यटनाबरोबर अजून एक पाऊल टाकत आहे ते म्हणजे गाव पर्यटन. मुलुख फार्म ला भेट देणारे पर्यटक दहिटणे गावाला भेट देतील गावातील जुनी मंदिर पाहतील ग्रामपंचायत कार्यालय इतर कचेऱ्या शाळा यांची माहिती घेतील तसेच शक्य असेल तर गावकऱ्यांशी संवाद साधतील. जुने वाडे, शेती पाहतील समजून घेतील. मुळामुठा नदी इथे कशी आहे पाहतील. पर्यटनाच्या हस्ते गावामध्ये, मुलुख मध्ये काळानुसार वृक्षारोपण होईल. असे अनेक उपक्रम मुलुख फार्मच्या माध्यमातून पर्यटकांसाठी उपलब्ध असतील.
वैशिट्ये
- जास्तीत जास्त नैसर्गिक अनुभव देण्याचा प्रयत्न.
- आलेल्या पर्यटकांकडून देशी तसेच फळझाडांची लागवड
- सध्या फणस १०, कवठ ५, जांभूळ ६, नारळ २००, आंबा ८०, चिंच ४०, डाळीब ८५० झाडांची विविध फळबाग आहे.
- पर्यटनाच्या ठिकाणी हवेशीर बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
- वृंदावन विभागाची उभारणी
- वृदावन विभागात उभारले भव्य मंदीर
- फुलझाडांची योग्य पद्धतीने लागवड
- औषधी वनस्पतीची लागवड
पर्यटनस्थळी हे बघायला मिळेल….
- सेंद्रिय शेती
- टाकाऊ वस्तूंपासून पासून बनवलेल्या खेळणी
- विविध पिकांची प्रात्यक्षिक
- कचऱ्यापासून खत निर्मिती
- रोपवाटिका
- टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती
- रेनवॉटर हार्वेस्टिग
- पारंपारिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी पारंपारिक औजारे, जात, उकळ, मुसळ, वरंवटा अशी मांडणी केलेल्या वस्तू दाखविल्या जातात.
- पाळीव प्राणीही येथे दाखवून त्याचे महत्व व वैशिष्ट्याची माहिती दिली जाते.
- पर्यटकांना बैलगाडीची शिवारफेरीची सफर
- शेकोटीचा अनुभव
विविध महोत्सवाचे आयोजन
- पावसाळ्यात पर्यटकांसाठी फळबाग लागवड, रानफुलाचे महोत्सव, महोत्सवाचे खास आयोजन केले जाते.
- इको फ्रेन्डली गणेशमूर्ति बनविण्यासाठी कार्यशाळा
- रानभाज्याचा महोत्सवाचे आयोजन
- हुरडा पार्टी महोत्सव
- उन्हाळ्यात आमरस पार्टी
आँक्सिजन पार्कची उभारणी :
हजारों वर्ष जुन्या माळरानातील दगडात
आँक्सिजन पार्कची उभारणी केली आहे. यामध्ये कडुनिबाची ३०० ते ४०० झाडे, बदाम १०, शिरीष ६, बांबू, बहावा, तामन, अर्जुन, पुत्रजय अशी विविध झाडाची लागवड केल्याने येथे स्वच्छ असे आँक्सिजन उलब्ध होण्यास मदत झाली आहे.
थंड हवेचे दर्शन
प्रदुषणमुक्त वातावरणामुळे मुलुख म्हणजे महाबळेश्वरसारखेच पाहण्यासाठी एक पर्वणीच आहे. इथल्या खडकावर निवांत पहुडाव आणि आकाशाच्या असीम अथांगतेचे दर्शन डोळ्यात साठवावे, अशी स्थिती आहे. झाडाच्या सानिध्यात थंड वातावरणाचा अनुभवण्यासाठी येथे उन्हाळ्यात अनेक पर्यटक येतात.
पक्षीनिरीक्षण :
पर्यटनाच्या ठिकाणी समृद्ध वनवैभव इथ अजूनही शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे महत्वाच केंद्र होत आहे.
शेतीच्या आवडीतून केले
वडिलांनी नोकरीं करत जोपसलेली शेतीच्या आवडीतून व्यवसाय संधी निर्माण केली आहे.पर्यटकांना विविध सुविधा निर्माण करून देताना आपलस केले आहे.
कृषिराज पिलाने
मुलुख फार्म दहिटने ता दौंड