गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला येथील मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ घेणार ताब्यात…मंत्री भुजबळांनी दिले निर्देश

by Gautam Sancheti
जुलै 10, 2025 | 5:24 am
in स्थानिक बातम्या
0
भारतरत्न

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला येथील कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. या प्रकल्पाच्या टप्पा २ व यापूर्वी तयार झालेली बांधकामे याची तात्पुरत्या स्वरूपात ‘बार्टी’ ही संस्था देखभाल करत आहे. त्यांनी स्मारक कामाची पाहणी व नियमानुसार तपासणी करून इमारतीचा ताबा घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच ‘बार्टी’ने जिल्हा वार्षिक योजनेतून बांधलेले शॉप (गाळे) ताब्यात घेवून ते व्यावसायिकांना वितरीत करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. टप्पा २ इमारतीच्या शेजारील रस्त्यालगतची जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेवून संरक्षण भिंत व गेट बांधकाम पूर्ण करून घ्यावे. यामध्ये आवश्यक ते सहकार्य संबंधित यंत्रणांनी करावे, असे निर्देश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

दादरची चैत्यभूमी आणि नागपुरच्या दिक्षाभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तीभुमीला ऐतिहासिक महत्व आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते.

मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेवून,या भूमीचा सर्वांगीण विकास केला आहे. फेज १ अंतर्गत याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल उभारण्यात आले. (₹१५कोटी)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तीर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये साकारलेल्या 15 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन 3 मार्च 2024 रोजी करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय इमारत साकारण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ-व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्फीथिएटर, मिटिंग हॉल, भिख्कू पाठशाला, १२ भिख्कू विपश्यना गृह, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग, याचा समावेश असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे आणि त्यामाध्यमातून समाजप्रबोधन व्हावे हा यामागचा हेतू आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून विहित वेळेत सर्व कामे पार पाडावीत असे आदेश देखील श्री. भुजबळ यांनी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना प्रगतीचे संकेत देणारा दिवस, जाणून घ्या, गुरुवार, १० जुलैचे राशिभविष्य

Next Post

आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द…स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर होणार कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rte

आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द…स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर होणार कारवाई

ताज्या बातम्या

crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
Hon CM Press Conf 2

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र निषेध

जुलै 31, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओ जालन्याच्या केलक्टर

जुलै 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011