सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकला देशभरातील मुक्त विद्यापीठ कुलगुरूंची दोन दिवसीय गोलमेज परिषद…

मार्च 5, 2025 | 6:34 pm
in संमिश्र वार्ता
0
Ariel View of YCMOU

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या कोल-सेमका (कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग – कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशियाचे (COL-CEMCA – Commonwealth Educational Centre For Asia) नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आजपासून देशभरातील सर्व मुक्त विद्यापीठांच्या कुलगुरूंची चौथी दोन दिवशीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या ‘यश-इन आंतराष्ट्रीय परिषद केंद्रात (यश-इन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर) होत असलेल्या या परिषदेत देशभरातील १७ मुक्त विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ शिक्षण अधिकारी सहभागी होणार आहेत. मुक्त व दूरशिक्षण पद्धतीच्या विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या ऑफलाईन आणि ऑनलाईन अंमलबजावणीचा यशमार्ग’ (पाथवे फॉर द इम्प्लेमेंटेशन ऑफ एनईपी-२०२० इन ओडीएल युनिव्हर्सिटीज : ऑफलाईन आणि ऑनलाईन मोड – Pathway for the Implementation of NEP-2020 in ODL Universities : Offline and Online Mode) या विषयावर ही परिषद होईल.

परिषदेच्या पहिल्या दिवशी गुरुवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या स्वागतपर भाषणाने या परिषदेची सुरुवात होईल. कोल–सेमकाचे संचालक डॉ. बी. शद्रच हे अहमदाबाद येथे झालेल्या देशभरातील मुक्त विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या प्रथम परिषदेतील घोषणापत्राची माहिती देवून या चौथ्या गोलमेज परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट करतील. उद्घाटन कार्यक्रमास भारत सरकारचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी (नवी दिल्ली) व यूजीसी-डीईबीचे संयुक्त सचिव डॉ. मधुकर वावरे (नवी दिल्ली) हे ऑनलाइन पद्धतीने प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर आशियाई मुक्त विद्यापीठांमध्ये कौशल्य आणि रोजगारक्षमतेसाठीचे सर्वोत्तम उपक्रम याविषयी बांगलादेश, चीन, पाकिस्तान व श्रीलंका येथील मुक्त विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण करतील. ‘मुक्त विद्यापीठांमधील पदवीधर रोजगारक्षमता प्रकल्प’ याविषयी एम.पी. भोज मुक्त विद्यापीठ (भोपाळ) चे कुलगुरू प्रा. संजय तिवारी माहिती देतील.

दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी प्रथम सत्रात सकाळी अहमदाबाद घोषणापत्रातील ठळक मुद्द्यांविषयी अहमदाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अमित उपाध्याय उहापोह करतील. त्यानंतर या घोषणेतील महत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर शिफारशी आणि उद्दिष्टेच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशच्या राजश्री टंडन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सत्यकाम यांच्या अध्यक्षतेखाली खुले चर्चासत्र होईल. त्यानंतर मुक्त विद्यापीठांच्या संघटनेची स्थापना करण्याविषयी हैदराबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सितारामा राव ऑनलाईन प्रस्ताव सादर करतील. या प्रस्तावातील कृतीयोग्य पावले ओळखण्यासाठी आणि जबाबदाऱ्या नियुक्त करण्यासाठी अधोरेखित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर उत्तराखंड मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ओ. पी. एस. नेगी यांच्या नेतृत्वात चर्चा होईल. दुपार सत्रात ‘मुक्त विद्यापीठांच्या संघटनेचे प्रशासन’ याविषयी आसामच्या के. खांडिकी राज्य मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेंद्र प्रसाद दास यांच्या नेतृत्वात खुले चर्चासत्र होईल. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची गुणपत्रक संबंधी ब्लॉक-चेन पद्धत आणि यश कार्डच्या सर्वोत्तम पद्धती, स्क्रीन मूल्यांकन याविषयी माहिती देण्यात येईल. त्यानंतर ‘उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम’ याविषयी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड (एमकेसीएल) पुणेचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत व वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. अमित रानडे माहिती देतील. तिसऱ्या सत्रात उपस्थित सर्व कुलगुरू आपले मनोगत व्यक्त करतील. पाठोपाठ कोल–सेमकाचे संचालक डॉ. बी. शद्रच हे मुक्त विद्यापीठांची भावी वाटचाल विषयी मार्गदर्शन करतील. अंतिम सत्रात महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागातील संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकार समारोपाचे भाषण करतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आभार प्रदर्शन करतील. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्रातर्फे (Centre for Internal Quality Assurance – CIQA-सिका) या परिषदेचे संयोजन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचे युवा तबलावादक अथर्व नितीन वारे यांना प्रसारभारतीची “A” ग्रेड प्राप्त…

Next Post

गोदाघाटावरील रामकुंड भागात टोळक्याने तरुणावर केला चाकू हल्ला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
crime1

गोदाघाटावरील रामकुंड भागात टोळक्याने तरुणावर केला चाकू हल्ला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011