नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : ‘नॅक’ द्वारे ‘अ’ श्रेणी मानांकित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.P80) या राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (NCTE) मान्यता दिलेल्या शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक ३१ जुलै २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) अशी आहे. प्रवेश अर्ज आणि माहितीपुस्तिका ही विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
सदर शिक्षणक्रमासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. पदविका पूर्ण केलेली असावी. तसेच, महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुणांसह, तर राखीव प्रवर्गासाठी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १०००/- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५००/- ऑनलाईन भरावे लागणार आहे.
शुल्क भरल्यानंतर अर्ज ऑनलाईनच सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac आणि http://www.ycmou.ac.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी असे आवाहन कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले आहे.