मुंबई – भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी हे एका सर्वेक्षणात देशातील सर्वात पॉवर कपल (शक्तिशाली जोडपे ) ठरले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) च्या वार्षिक पॉवर कपल सर्व्हेमध्ये, हे जोडपे 94 टक्के गुणांसह प्रथम (नंबर वन) आले.
विशेष म्हणजे या यादीत बॉलीवूडची बहुतेक जोडपी सहभागी झाली आहेत. यामध्ये प्रथमच कॉर्पोरेट जगतातील काही जोडप्यांचाही समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात 25 ते 40 वयोगटातील 1362 नागरिकांनाची त्यांची मते विचारण्यात आली. त्यामध्ये 761 पुरुष आणि 601 महिलांचा समावेश होता. या सर्वेक्षणात अभिनेता रणवीर सिंग – दीपिका पदुकोण ही जोडी 86 टक्क्यांसह दुसऱ्या तर विराट कोहली – अनुष्का शर्मा यांची जोडी 79 टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आणखी मजेची गोष्ट म्हणजे या यादीत आज लग्न झालेल्या कतरिना कैफ – विकी कौशल (कॅटविक) हे 9 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच हे सर्वेक्षण झाले होते. यापूर्वी हे IIHB कडून पॉवर जोडप्यांचे सर्वेक्षण 2019 मध्ये करण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी हे सर्वेक्षण झाले नव्हते. या यादीत कॉर्पोरेट जगतातील 5 जोडप्यांचा टॉप 20 मध्ये समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती – सुधा मूर्ती हे 10 व्या, सीरम इन्स्टिट्यूटचे आदर – नताशा पूनावाला 11व्या तर विप्रोचे अझीम – यास्मीन प्रेमजी 16व्या, ग्रुपचे महिंद्रा आनंद – अनुराधा महिंद्रा 19व्या आणि आदित्य ग्रुपचे कुमार मंगलम – नीरजा बिर्ला 20व्या स्थानावर आहेत.