इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याच्या तयारीत आहेत. अंबानी यांनी या नवीन युनिटसाठी कर्मचार्यांची नियुक्ती सुरू केली आहे, तसेच त्याच्या देखरेखीसाठी एक व्यवस्थापक देखील नियुक्त केला आहे. एवढेच नाही तर सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्यासाठी रिअल इस्टेट प्रॉपर्टीचीही निवड करण्यात आली असून या ऑफिससाठी एक जागाही निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात अन्य देशांच्या तुलनेत सर्व टॅक्स कमी व सुरक्षेमुळे सिंगापूर हे ठिकाण अतिश्रीमंत लोकांमध्ये फॅमिली ऑफिससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हेज फंड अब्जाधीश रे डेलियो व गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रीन यांनीही सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू केली आहेत. त्यांच्या बरोबर आता मुकेश अंबानी यांचा समावेश होणार आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये सिंगापूरमध्ये कार, घर आणि अन्य वस्तूंच्या विक्री व खरेदीत वाढ होत असल्याने तेथील मार्केट काबीज करण्यासाठी रिलायन्सने ही योजना आखली आहे.
विशेषतः अनेक कुटुंबांना व्यावहारिक बाबींचे नियोजन आणि अंमलबजावणी स्वतः करणे जमत नाही त्यांच्यासाठी एकत्रितपणे नियोजन, व्यवस्थापन आणि त्याची अंमलबजावणी करणारी व्यवस्था म्हणजेच फॅमिली ऑफिस होय.भारतामध्ये हि संकल्पना काहीशी नवीन असली तरी, आता अशा प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या संस्था वाढत चालल्या आहेत. अशी संस्था एखाद्या कुटुंबाला जेव्हा सगळ्या सेवा एकाच छताखाली पुरविते.
सदर ऑफिस हे वकील, गुंतवणूक सल्लागार, विमा सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट यांच्या सेवा एकत्रित पुरविणारी संस्था आहे. बऱ्याचदा कायदेशीर बाबी, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, विमा नियोजन, पुढील पिढीकडे हस्तांतरण, व अकाउंट्स या सर्व बाबी एकमेकांशी निगडित असतात. ग्राहक या सगळ्यांमधे ताळमेळ बसवतांना त्रास होतो कारण प्रत्येक विषय हाताळणारी व्यक्ती वेगवेगळी असते. त्यांच्यासाठी फॅमिली ऑफिस उपयुक्त ठरते
गेल्या काही वर्षांपासून मुकेश अंबानी हे भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. परंतु अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाल्यामुळे ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सध्या अदानी समूहाने पेट्रोलियम, माध्यम आणि टेलिकॉम क्षेत्रातही एन्ट्री केल्याने रिलायन्स कंपनीला तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता मुकेश अंबानींनी अदानींना शह देण्यासाठी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सिंगापूरमध्ये अनेक श्रीमंत व्यक्तींनी तिथे फॅमिली ऑफिस सुरू केली आहेत. सध्या येथे सुमारे ८०० फॅमिली ऑफिस सुरु झाली आहेत. त्यात आता अंबानी ग्रुप ची भर पडणार आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी याही सिंगापूरमध्ये कार्यालय उघडण्यासाठी मदत करत आहेत. सिंगापूर फॅमिली ऑफिस वर्षभरात सुरू व्हावे, अशी अंबानींची इच्छा आहे. रिलायन्स आपल्या जुन्या तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातून ई-कॉमर्स, ग्रीन एनर्जी आणि संपूर्ण भारतातील रिटेलच्या विस्ताराकडे वळत आहे.
Mukesh Ambani Will Open Family Office in this Country