मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मते, भारतात तीन दशकांपूर्वी झालेल्या आर्थिक सुधारणांचा असमान लाभ मिळाला आहे. समाजातील अतिगरीब वर्गात आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विकासाचे भारतीय मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. २०४७ पर्यंत भारत अमेरिका आणि चीनच्या बरोबर पोहोचण्याची शक्यता आहे, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला आहे.
देशात आर्थिक उदारीकरणाला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत. आर्थिक सुधारणांच्या धाडसी निर्णयामुळे १९९१ मध्ये आपले सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २६६ अब्ज डॉलर होते. आज ते दहा पटीने वाढले आहे. सर्वात मोठ्या कंपनी समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे.
मुकेश अंबनी लिहितात, १९९१ मध्ये भारताची सर्वात छोटी अर्थव्यवस्था होती. २०२१ मध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्थेत त्याचे रूपांतर झाले आहे. भारताने आता २०५१ पर्यंत हा स्तर टिकवून सर्वांचा समान विकास करणार्या अर्थव्यवस्थेत बदल केला पाहिजे. भारताने १९९१ मध्ये अर्थव्यवस्थेची दिशा आणि निर्धार दोन्ही बदलण्याची दूरदृष्टी आणि धाडस दाखविले आहे.
सरकारने खासगी क्षेत्रांनासुद्धा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत प्रभावशाली जागेवर नेऊन ठेवले आहे. त्यापूर्वीच्या चार दशकांमध्ये फक्त सार्वजनिक क्षेत्रांनाच हे स्थान मिळाले होते. यामुळे परवाना-कोटा पद्धत समाप्त झाली. व्यापार आणि औद्योगिक धोरण उदार झाले. शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्र मुक्त होऊ शकले.
या सुधारणांमुळे भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला आहे. यादरम्यान लोकसंख्या ८८ कोटींवरून १३८ कोटींवर पोहोचली. परंतु गरिबीचा दर निम्मा झाला आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांध्ये अधिक प्रमाणात सुधारणा झाली.
२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याचे शंभर वर्षे पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत भारताला जगातील तीन सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक श्रीमंत बनविण्यासाठी आपण सक्षम होऊ. याहून मोठे स्वप्न काय असू शकेल. आपण अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने असू.
भविष्यातील वाट सोपी नाहीये. महामारीसारख्या अचानक येणार्या अस्थायी संकटांना घाबरले नाही पाहिजे. अनावश्यक मुद्दयांमुळे आपले लक्ष हटवू नये. आगामी ३० वर्षे स्वतंत्र भारताच्या इतिसाहासातील सर्वात श्रेष्ठ वर्षांमध्ये बदलतील. या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी आत्मनिर्भर आणि जगातील इतर देशांना सहकार्य करणारा भारत आपल्याला बनवायचा आहे.