इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोटेक लिमिटेडच्या व्यवस्थापनात फार मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत, रिलायन्स जिओने सांगितले की, बोर्डाची बैठक 27 जून रोजी झाली आहे. बैठकीत रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जूनपासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
पंकज मोहन पवार यांनी 27 जूनपासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. पवार पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील. रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी 27 जून पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश अंबानी यांची गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे.
रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी आहे. Jio Platforms ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीची स्थापना 2019 मध्ये झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज BSE वर रु. 2,529.00 वर बंद झाला, जो कालच्या बंद किमतीपेक्षा 1.49 टक्क्यांनी जास्त आहे. शेअर NSE वर 1.50% वाढून प्रति शेअर ₹2530.00 वर बंद झाला.
https://twitter.com/ANI/status/1541744245513801729?s=20&t=uXHXVAqyanmmrd2xC0J43w
Mukesh Ambani resigned Reliance Jio Akash Ambani named new chairman of the board