मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जात बुडालेल्या कापड उद्योग क्षेत्रातील सिंटेक्स इंडस्ट्रिज कंपनीचे नशीब लवकरच पालटणार आहे. या कंपनीसाठी देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज (आरआयएल) आणि एसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन इंटरप्राइज (एसीआरआय) या दोन्ही कंपन्यांनी मिळून बोली लावली आहे. बोली लावण्यासाठी कर्जदात्यांची मान्यता मिळाली आहे. हे प्रकरण आता राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) कडे पाठवले असून, एनसीएलटीकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
रिलायन्स आणि एसीआरआय यांनी शेअर बाजाराला याबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार, सिंटेक्स इंडस्ट्रिजच्या उपाय योजणाऱ्या सल्लागाराने २३ मार्च २०२२ रोजी दिवाळखोरी अक्षमता कायद्याच्या २०१६ च्या कलम ३०(६) अंतर्गत एलसीएलटीच्या अहमदाबाद खंडपीठासमोर उपाययोजनांची योजना सादर केली आहे. सिंटेक्स इंडस्ट्रिजच्या कर्जदाता समितीने (सीओसी) दोन्ही कंपन्यांच्या उपाययोजनांच्या योजनेला यापूर्वीच मान्यता दिली होती.
गेल्या मंगळवारी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) ने सिंटेक्स इंडस्ट्रिजवर व्यवसाय करण्यास बंदी घातली होती. यामुळे गुंतवणूकदार कोणत्याही शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. सिंटेक्स ही कापडनिर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. सिंटेक्स इंडस्ट्रिज दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यावर कारवाई सुरू झाली होती.