इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्यात कुवेती टायकून मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबाकडून पाम जुमेराह हवेली सुमारे १६३ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली आहे.
दुबईच्या भूमी विभागाने खरेदीदाराची ओळख उघड न करता कराराचा तपशील दिला आहे. रिलायन्स आणि अलशायाच्या प्रतिनिधींकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. कुवेतच्या दिग्गज उद्योगपती अल्शाया ग्रुपकडे स्टारबक्स, एचअँडएम आणि व्हिक्टोरियाज सिक्रेटसह रिटेल ब्रँडच्या स्थानिक फ्रँचायझी आहेत.
त्याच वेळी, मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती ८४ अब्ज डॉलर आहे. आशियातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा दुसरा क्रमांक लागतो.
अंबानींनी वर्षाच्या सुरुवातीला ८० दशलक्ष डॉलर किंमतीला आलिशान वाडा खरेदी केला होता. त्यानंतर आता ही हवेली खरेदी केली आहे. जुन्या वाड्यापासून आताची हवेली अगदी थोड्या अंतरावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्सने प्रतिष्ठित यूके कंट्री क्लब स्टोक पार्क विकत घेण्यासाठी गेल्या वर्षी ७९ दशलक्ष डॉलर खर्च केले होते. त्याचबरोबर मुकेश अंबानी हे देखील न्यूयॉर्कमध्ये प्रॉपर्टी शोधत आहेत.
Mukesh Ambani Dubai Property Buy
Reliance Industry Palace