नवी दिल्ली, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक उद्योग व्यवसायात अनेक भारतीय उद्योजकांनी मोठी भरारी घेतली आहे. या भारतीय उद्योजकांनी अनेक देशांमध्ये आपला उद्योग व्यवसाय वाढविला असून त्यांची संपत्ती आता कोट्यावधी डॉलर्स मध्ये गणली जात आहे. अनेक श्रीमंत उद्योजकांना पैकी अब्जाधीश उद्योजक म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी हे नवनवीन व्यवसायात पदार्पण करतात, तसेच काही व्यवसायांमध्ये पुन्हा एकदा त्याचे रिकन्स्ट्रक्शन किंवा पुनर्बांधणी करतात. मुकेश अंबानी यांनी नुकत्याच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक अत्यंत आलिशान हॉटेल खरेदी केले असून याची जगभरातील उद्योग व्यवसायात मोठी चर्चा होत आहे.
अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे प्रीमियम लक्झरी हॉटेल मंदारिन ओरिएंटल 98.15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 728 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे मंदारिन ओरिएंटल हॉटेल, 2003 मध्ये बांधले गेले असून ते न्यूयॉर्कमधील 80 कोलंबस सर्कल येथे असलेले एक प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल म्हणून ओळखले जात आहे. हे हॉटेल प्राचीन सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या जवळ आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेडने शनिवारी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (केमन) ची संपूर्ण कंपनी अंदाजे 98.15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आहे, यात शेअर कॅपिटल, केमन आयलंडमध्ये समाविष्ट केलेली कंपनी आणि मँडरीन ओरिएंटल न्यूयॉर्कमध्ये 73.37 टक्के अप्रत्यक्ष मालकी मिळवण्यासाठी करार केला.
रिलायन्सने पुढे म्हटले आहे की, सदर व्यवहार हा मार्च 2022 च्या अखेरीस होणे अपेक्षित आहे आणि काही प्रथागत नियामक आणि इतर मंजूरी आणि काही इतर अटींच्या समाधानाच्या अधीन आहे’. रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आयकॉनिक हॉटेलचे हे दुसरे अधिग्रहण आहे.
रिलायन्सने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, ब्रिटनचा पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट, स्टोक पार्क, 592 कोटी रुपयांना विकत घेतले, जिथे दोन जेम्स बाँड चित्रपटांचे चित्रीकरण देखील झाले आहे. न्यूयॉर्कच्या मंदारिन ओरिएंटलला जागतिक मान्यता आहे आणि त्यांनी AAA फाइव्ह डायमंड हॉटेल, फोर्ब्स फाइव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाइव्ह स्टार स्पा यासह प्रभावी पुरस्कार जिंकले आहेत. रिलायन्स फाइलिंगनुसार, 2018 मध्ये त्याची कमाई 115 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स 2019 मध्ये 113 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स 2020 मध्ये USD 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती.