नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थाना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत तसेच राज्यातील विविध महाविद्यालयात वैदयकीय शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थाच्या विविध प्रश्नाबाबत राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी आज दि २४ रोजी रोजी नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूं लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची भेट घेऊन चर्चा केली असता शासन व आरोग्य विज्ञान विद्यापीठ मागासवर्गीय विद्यार्थाच्या विविध प्रश्नाबाबत सकारात्मक असल्याने विद्यार्थाचे विविध प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत.
राज्यातील विविध महाविद्यालयाकडुन वैदयकीय शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थाकडे शिष्यवृत्ती रक्कमेची मागणी होत आहे. तसेच इतर प्रश्नाबाबत समाज कल्याण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने त्याअनुषंगाने समाज कल्याण विभागाचे आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे हे आज रोजी नाशिक दौ-यावर आले असता सायंकाळी त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूं लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची विद्यापीठात भेट घेऊन जी महाविद्यालये शासनाच्या आदेशांचे पालन करित नाहित त्यांना विद्यापीठांच्या वतीने सक्त सूचना देण्याबाबतची मागणी आयुक्त यांनी यावेळी कुलगुरूंकडे केली.
सध्याच्या कोविड संकटात जिथे बहुतेक कुटुंबे गंभीर आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत, अशावेळी वैदयकीय शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थाच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि संस्था प्रमुखांना शासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करण्याच्या सूचना विद्यापीठस्तरावरून देण्यात येतील असे यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी सांगितले त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाने समान संधी केंद्राची संकल्पना माडली आहे त्यासाठी देखील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरु करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचेही कुलगुरू यांनी यावेळी सांगिलते. अनुसूचित जाती, नवबौद्ध ,विमुक्त जाती भटक्या जमाती ,इतर मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय घटाकातील तरुण, व महिलासाठी विशेष कौशल्यावर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रम राबविणे सह इतरहे प्रश्नाबाबत यावेळी सकारात्मक करण्यात चर्चा करण्यात झाली. यावेळी विद्यापीठाचे रजिस्टार डॉ.कैलास चव्हाण, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भागवान वीर ,उपायुक्त रवींद्र कदम पाटील,उपायुक्त माधव वाघ, सहायक आयुक्त सुंदर्शिंग वसावे, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या समाज कल्याण विभाग व विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.