नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक-2021 मधिल सर्व विद्यार्थी सदस्यांची बिनविरोध झाली आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेतून बिननविरोध निवड झालेल्या सर्व पदाधिकाÚयांचे लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागचे प्र.संचालक श्री. संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
यावेळी लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु म्हणाल्या की, विद्यापीठाच्या सर्वाेच्च मंडळावर आपली निवड झाली असल्याने आपले अभिनंदन करते. विद्यापीठाचा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांच्या अडचणी किंवा शैक्षणिक समस्या असल्यास विहित मार्गाने विद्यापीठाकडे सादर कराव्यात. विद्यापीठाचे कार्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने व शिस्तीने काम करावे. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्य करुन आदर्श निर्माण करावा. कोविडच्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वांनी उल्लेखनीय काम केले आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात याचा महाविद्यालय, परिसारात माहितीचा प्रसार व प्रचार करावा असे त्यांनी सांगितले.
याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 कलम 23(2)(टी) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडुन देण्याची तरतूद आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेव्दारे मुंबईचे नायर हॉस्पिटल दंत महाविद्यालयाचा ओमकार उमेश शिंेदे, कोल्हापूरचे आर.सी.एस.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा केतन सुनिल ठाकूर, बीडचे एस. के. होमिओपॅथी महाविद्यालयाचा ऋषिकेश संतोषजी जेठालिया या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी राहुरीचे एस.व्हीएन.एच.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा कृष्णा तुकाराम शेळके यांची निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी पुण्याचे एस.के. जिंदाल महाविद्यालयाचा अंकुश विलास गोरे तसेच मुंबईचे तेरणा फिजीओथेरपी महाविद्यालयाचा लोकहित धमेंद्र अडे यांची निवड झाली आहे.
सचिव पदाकरीता नागपूरचे एस.के.आर. पांडव आयुर्वेद महाविद्यालयाची वर्दा प्रकाश कर्णिक यांची, सहसचिव पदाकरीता औरंगाबादचे कमलनयन बजाज परिचर्या महाविद्यायाचा जयेश निरंजन घोरपडे आणि नाशिकचे एम.व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाची आदिती अजय मुंदडा यांची निवड झाली आहे.
विद्यापीठ परिषद निवडणूक प्रारंभी उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधींना विधी अधिकारी श्री. संदीप कुलकर्णी यांनी विद्यार्थी परिषदेबाबत थोडक्यात माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशासन विभागाचे श्री. राजेेंद्र नाकवे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बाळू पेंढारकर, श्री. किशोर पाटील उपस्थित होते. या निवडणुक प्रक्रियेकरीता श्री. राजेश इस्ते, श्रीमती शैलजा देसाई, श्री आबाजी शिंदे, श्री. रमेश पवार यांनी परिश्रम घेतले. विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवरील निवड झालेल्या सदस्यांचे विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.