नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेकरीता घेण्यात येणाÚया लेखी परीक्षा वेळापत्रकात अशंतः बदल करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेकरीता दि. 14 ऑक्टोबर 2022, दि. 15 ऑक्टोबर 2022 व दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यातील विविध परीक्षा कें्रदावर आयोजित लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव सदर वेळापत्रकातील काही पदांच्या परीक्षेच्या वेळेमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. सदर सुधारित वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ ूूूण्उनीेण्ंबण्पद वर प्रसिध्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या भरतीप्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची लेखी परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर व नाशिक येथील निर्देशित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10ः00 ते दुपारी 12ः00 वेळेत लिपिक कम टंकलेखक, डेटा इंट्री ऑपरेटर, रोखपाल, भांडारपाल या पदासाठी तसेच दुपारी 02ः00 ते दुपारी 04ः00 वेळेत कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक पदासाठी आणि सायंकाळी 05ः00 ते सायंकाळी 06ः15 वेळेत शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10ः00 ते दुपारी 12ः00 वेळेत वरिष्ठ लिपिक कम डेटा इंट्री ऑपरेटर पदाकरीता तसेच दुपारी 02ः00 ते दुपारी 04ः00 वेळेत वरिष्ठ सहायक पदासाठी आणि सायंकाळी 05ः00 ते सायंकाळी 06ः15 वेळेत वाहन चालक पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिक येथे सकाळी 10ः00 ते दुपारी 12ः00 वेळेत सहायक लेखापाल, वीजतंत्री पदांसाठी तसेच दुपारी 01ः00 ते दुपारी 02ः30 वेळेत निम्मश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, छायाचित्रकार, आर्टिस्ट कम ऑडिओ अॅण्ड व्हिडीओ एक्सपर्ट या पदांसाठी तसेच दुपारी 03ः30 ते 05ः30 वेळेत सांख्यिकी सहायक पदासाठी आणि दुपारी 03ः30 ते सायंकाळी 05ः00 वेळेत विद्युत पर्यवेक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व अर्जदारांनी परीक्षा वेळेतील बदलाबाबत नोंद घ्यावी.
MUHS Recruitment Written Exam Schedule