नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. तसे पत्र विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी काढले आहेत. महाविद्यालयीन स्तरावर या विषयाच्या पेपरमधील काही प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत आता हा पेपर रद्द करण्यात आला असून या विषयाची परीक्षा आता येत्या २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने काढलेले परिपत्रक असे