गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण निवडणूकीचा निकाल जाहिर

मार्च 20, 2023 | 8:11 pm
in स्थानिक बातम्या
0
DSC 0794 scaled e1679323219708

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. विद्यापीठ अधिसभा व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणुक निकाल जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे. विविध अभ्यासमंडळासाठी उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती.

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील सहा महसुल विभागात निवडणूक घेण्यात आली, यामध्ये मुंबई विभागातून डेरे राजेश चंद्रकांत, पुणे विभागातून गायकवाड सायबू लक्ष्मण, नाशिक विभागातून भाबड प्रदीप रामराव, औरंगाबाद विभागातून पवार बाळासाहेब शिवाजी, अमरावती विभागातून उबरहंडे राजेश्वर तुकाराम व नागपूर विभागातून दातारकर अभय निलकंठ हे उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत विद्यापरिषदेसाठी प्राचार्य गटात आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेतून कुलकर्णी माणिकराव हणमंतराव बिनविरोध तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतून पाथरीकर अनुपमा व्दारकादास व तत्सम विद्याशाखेतून ठाकूर ज्योती राजेश हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून देवकर रविंद्र बळीराम, दंत विद्याशाखेतून जाधव प्रशांत दत्तात्रय, होमिओपॅथी विद्याशाखेतून ठाकरे भालचंद्र रामकृष्ण व तत्सम विद्याशाखेतून गिरी विश्रांती हे उमेदवार विजयी झाले आहे.
विद्यापीठ अधिसभेकरीता निवडणूक प्रक्रियेव्दारे राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक विभागात मतदान घेण्यात आले आहे यातून सहा प्राध्यापक निवडण्यात आले आहेत.

याचबरोबर प्रत्येक विद्याशाखेतून एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम मतदान घेण्यात आले आहे. त्यातून अधिसभेकरीता पाच प्राध्यापक वगळता शिक्षक निवडण्यात आले आहेत. विद्यापीठ विद्यापरिषदेकरीता प्राचार्य व अधिष्ठाता यांच्यामधुन प्रत्येक विद्याशाखेमधून प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील प्राचार्य करीता मतदान घेण्यात आले आहे. प्रत्येक अभ्यासमंडळाकरीता सहा विभागप्रमुख याप्रमाणे 18 विविध (पदवी व पदव्युत्तर एकत्रित) अभ्यासमंडळाकरीता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी करीता निवडणूक घेण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळकारीता राज्यातील विविध 42 मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या निवडणूकीत एकूण 57.87 टक्के मतदान झाले आहे. विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राधापक वगळता शिक्षक गटाकरीता मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी एकूण 11742 उमेदवारांपैकी 6795 मतदारांनी मतदान केले होते. राज्यात सर्वाधिक मतदान वाशिम जिल्हयातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्याचे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे 12.81 टक्के झाली आहे.

विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या समवेत निवडणुक मतमोजणीच्या कामकाजासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. बबनराव उधाणे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. उपकुलसचिव श्री. फुलचंद अग्रवाल आदी तज्ज्ञ व्यक्तींचा तसेच उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, डॉ. सुनिल फुगारे, अॅड. संदीप कुलकर्णी, श्री. अनंत सोनवणे, श्री. राजेंद्र नाकवे, श्री. संजय कापडणीस, श्री. संदीप राठोड यांचा समावेश होता. या कामकाजाकरीता श्री. अविनाश सोनवणे, श्रीमती रंजीता देशमुख, श्रीमती शैलजा देसाई, श्री. मोहन सोळशे, श्री. संजय सुराणा, श्री. आनंद जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

MUHS Election Results Declared Today

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक होणार आई; सहा वर्षांनी मिळणार मातृसुख (Video)

Next Post

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011