नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, १४ ऑगस्ट २०२५ रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत राज्यातील आय-सिरिता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.
संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी कळविले आहे.