मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा व ट्रकच्या भीषण अपघतात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय मुदखेड व विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Mudkhed Accident Death Nominee 5 Lakh Government