मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी नेहमीच विविध कारणाने चर्चेत आहेत. सध्या काही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला असून काहींचे बाकी आहेत, पण त्यांची अनेक वैद्यकीय बिले मात्र अडकली आहेत. ते कधी मिळणार याची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. एसटी महामंडळाचा तोटा, कधी अपघात या संदर्भात नेहमीच खूलासे होतात, तसेच कधी कर्मचाऱ्यांचे पगार बोनस वगैरे बाबत सरकारला नेहमी विचारणा होत असते, आता वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची शाश्वती नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च महामंडळाकडून मिळावा, अशी अपेक्षा असते, परंतु अनेकदा होत नाही, असे काही एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही सणासुदीच्या काळात एसटी कर्मचारी संप करतात की काय अशी शंका व्यक्त होत होती कारण कर्मचाऱ्यांचे पगार अडकले होते तसेच त्यांना बोनसही मिळत नव्हता मात्र आता कर्मचाऱ्यांचे पगार झाले असून काही कर्मचाऱ्यांचे उर्वरित कर्मचाऱ्यांचे पगारही लवकरच जमा होणार आहेत त्याचप्रमाणे त्यांना बोनसही मिळणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र संप काळात जे कर्मचारी आजारी होते तसेच त्यांचे कुटुंब देखील आजारी होते, त्या संदर्भातील वैद्यकीय बिले आणि अन्य बिले मात्र अद्यापही मंजूर झालेली नाहीत त्यामुळे त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे, ही बिले तातडीने मंजूर करावीत अशी मागणी होत आहे, विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील सुमारे दोन ते तीन वर्षापासूनची बिले अडकलेले आहेत, ती देखील तातडीने मंजूर व्हावीत, अशी मागणी होत आहे. मात्र आता एसटी महामंडळ आणि राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरे म्हणजे एसटी महामंडळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतरही संबंधीत बिल निघण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. अनेक महिने बिल निघतच नाही. काही वेळा तर वर्ष उलटून गेल्यानंतरही बिल मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. विशेषतः वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची खात्री नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च लगेच मिळावा, अशी मागणी होत आहे, मात्र संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन दिलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय बिलाबाबत आपण निर्णय घेतल्यास अडचणीत येऊ, असे एसटीच्या प्रशासनाला शंका आहे. मात्र सामाजिक बांधिलकीतून या कर्मचाऱ्यांना तातडीने बिलाचे देयक तथा रक्कम मिळावी अशी मागणी होत आहे.
MSRTC ST Bus Employee 4 Crore Bills Stuck