रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सरकार कोणतेही येवो एसटी कर्मचाऱ्यांची परवड कायम; न्यायालयाच्या आदेशानंतरही जानेवारीचा पगार रखडला

फेब्रुवारी 14, 2023 | 9:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिवहन आणि अर्थ खात्यातील वादाचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. दोन विभागातील विसंवादामुळे कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. सरकार कोणतेही आले तरी एसटी कर्मचाऱ्यांची प्रचंड परवड होत असल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी ३६० कोटी रुपये मिळाले हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्यानं महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकीत रक्कम मागितली होती. मात्र, अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात १६ फेब्रुवारी रोजी अर्थ, परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारनं कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. अशात आता पगाराचे भविष्यच विवरणावर अवलंबून असल्यानं कर्मचारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

न्यायालायात प्रश्न जाऊनही
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतुद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात संप काळात मान्य केले होते. जानेवारी महिन्यात १९ तारखेला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी १०१८.५० कोटी रुपयांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती पण त्याला आता एक महिना होत आला तरीही सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यासाठी परिवहन आणि अर्थ खात्यातील बेबनाव कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

MSRTC Employee January Salary Pending

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वात मोठी खरेदी! टाटाने एकाच झटक्यात खरेदी केले तब्बल २५० विमान; या कंपनीला दिली ऑर्डर

Next Post

येवला- मनमाड राज्यमहामार्गावर भरधाव कंटेनरने अनेक गाड्या उडविल्या; १ ठार तर ५ जण जखमी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230214 WA0299 e1676390343344

येवला- मनमाड राज्यमहामार्गावर भरधाव कंटेनरने अनेक गाड्या उडविल्या; १ ठार तर ५ जण जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011