नाशिक: नाशिक परिमंडळामध्ये १० व ११ मार्च रोजी नाशिक व मालेगाव मंडळातील तालुकानिहाय व उपविभागनिहाय महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये कृषीपंप वीज देयकाच्या दुरुस्तीसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिक मंडळातील ८४६ ग्राहकांनी सहभाग नोंदविला यामध्ये प्राप्त ४१३ तक्रारींपैकी १९२ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करून देऊन २३ लाख ८६ हजार रुपयांचा भरणाकेला तसेच मालेगाव मंडळातील ८१० ग्राहकांनी सहभाग नोंदवित यामध्ये प्राप्त ३७९ तक्रारींपैकी २६९ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करण्यात येऊन कृषी पंप वीज देयकाच्या थकबाकी मधील ११ लाख ५८ हजार रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला. अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात १६५६ ग्राहकांनी सहभाग नोंदवित त्यांच्या ४६१ तक्रारींचे निवारण करण्यात आले, यासोबतच कृषी बिलाच्या थकबाकीतील ३५ लाख ४४ हजार रुपयांचा भरणासुद्धा ग्राहकांनी शिबिरात केला.
सदर वीज बिल दुरुस्ती शिबीर हे गुरुवार १० मार्च रोजी मालेगाव मंडळातील कळवण, मालेगाव, मनमाड व सटाणा विभागाअंतर्गत उपविभागामध्ये आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये मनमाड विभागात ४२७ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात २८३ ग्राहकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील १९९ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ३ लाख रुपयांचा भरणाही यावेळी केला. सटाणा विभागात १०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १२ ग्राहकाच्या तक्रारी १२ तक्रारींचेही निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ७ लाख ७ हजार रुपयाचा भरणा केला. मालेगाव विभागात १७१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये प्राप्त ३४ ग्राहकाच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ८५ हजार रुपयाचा भरणा केला. कळवण विभागात ११२ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ५० ग्राहकाच्या तक्रारीपैकी २४ तक्रारींचे निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ६४ हजार रुपयाचा भरणा केला. असे एकूण मालेगाव मंडळात ८१० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ३७९ ग्राहकाच्या तक्रारींपैकी २६९ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ११ लाख ५८ हजार रुपयाचा भरणा केला.
शुक्रवार ११ मार्च रोजी नाशिक मंडळातील चांदवड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर १ व नाशिक शहर २ विभागाअंतर्गत उपविभागामध्ये वीज बिल दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये चांदवड विभागात २१४ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात ६९ ग्राहकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील ४८ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ४ लाख ७ हजार रुपयांचा भरणा केला. नाशिक ग्रामीण विभागात २३५ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १०४ ग्राहकाच्या तक्रारी २१ तक्रारींचेही निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ४ लाख ६१ हजार रुपयाचा भरणा केला. नाशिक शहर १ विभागात १० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ६ ग्राहकाच्या तक्रारींपैकी ५ तक्रारींचे निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ७ लाख १४ हजार रुपयाचा भरणा केला. नाशिक शहर २ विभागात ३८७ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त २३४ ग्राहकाच्या तक्रारींपैकी ११८ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ८ लाख ४ हजार रुपयाचा भरणा केला. असे एकूण नाशिक मंडळात ८४६ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ४१३ ग्राहकाच्या तक्रारींपैकी १९२ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी २३ लाख ८६ हजार रुपयाचा भरणा केला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर तसेच मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले. कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेशक कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. यानुसार थकबाकीदार कृषिपंप धारकांना वीजदेयकाची थकबाकी भरतांना निर्लेखनाद्वारे तथा व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिली आहे. मात्र या योजनेत बिले भरतांना वीज बिले दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणला प्राप्त झाली होती त्यानुसार शिबीर आयोजित करण्यात आले होते.