मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने हताश झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बाब राज्यभरात चिंतेची ठरली आहे. गेल्या दीड वर्षांपासून अनेक तरुण नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य सरकारने उत्तीर्णांना नियुक्ती दिली नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्यात येतील, असा गंभीर इशारा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासंदर्भात या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. तसेच, या पत्राद्वारे सामुदायिक आत्महत्येची परवानगीही मागितली आहे.
विद्यार्थ्यांचे पत्र असे