मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही थेट निवडणूक आयोगालाच पत्र लिहिल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सोशल मिडियात त्याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. अनेकांनी शिंदे यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. विरोधकांनाही हा मुद्दा चांगलाच मिळाला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना उठता, बसता केवळ निवडणूक आयोगच दिसत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.
बघा, मुख्यमंत्री काय म्हणाले त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1628323391357997056?s=20
MPSC Student Agitation CM Eknath Shinde Reaction Video