सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

MPSCच्या मनमानी कारभाराने तरूणांच्या स्वप्नाची माती! जुन्याच अटींसह मुदतवाढ.. धूळफेक केल्याने पदव्युत्तर पदवी धारकांचा संताप

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज

एप्रिल 13, 2023 | 2:24 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
mpsc

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मनमानी धोरणामुळे राज्यातील लाखो पत्रकारितेच्या ‘पदव्युत्तर पदवी’ धारक सुशिक्षित तरूणांच्या स्वप्नांची माती होणार आहे. ‘उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ या पदांच्या जाहिरातीस मुदतवाढ मिळाली आहे; मात्र जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या पात्रतेत कोणताही बदल न करता जून्याच शैक्षणिक अटींमध्ये फक्त काही बॅचलर पदव्या समाविष्ट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने धूळफेक केली आहे. चुकीच्या जाहिरातीस सुधारित सेवा प्रवेश नियम होईपर्यंत स्थगिती न देता, याउलट अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देत सुशिक्षित बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ‘पदव्युत्तर पदवी’ ची उच्च शैक्षणिक अर्हता या पदांसाठी पात्र ठरत नसेल तर या पदव्यांची होळी करायची का? असा संतप्त सवाल लाखो विद्यार्थ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ पदांसाठी जम्बो पदभरतीची जाहिरात प्रसिध्द केली. मात्र जाहिरात प्रसिध्दीच्या दुसऱ्याच दिवसापासून वाद सुरू झाला. कारण पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. याऊलट पत्रकारितेत पदवी व पदविका घेतलेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र ठरले. म्हणजे पत्रकारिता विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांना विद्यार्थी या पदांच्या अर्ज प्रक्रियेपासून वंचित ठरले. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि माहिती व जनसंपर्क विभागाने एकमेकांकडे टोलवाटोलवी करत विद्यार्थ्यांची बोळवण केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणते, माहिती व जनसंपर्क विभागाने केलेल्या सेवा प्रवेश नियम २०१५ प्रमाणे जाहिरात प्रसिध्द केली. तर माहिती व जनसंपर्क विभागाचे म्हणणे आहे की, “पत्रकारितेच्या पदवीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चूकीचा अर्थ काढत सरळसरळ ‘बॅचलर’ पदवी असा अर्थ काढला. वस्तुत; पत्रकारितेची पदवी म्हणजे त्यात सर्व बॅचलर, मॉस्टर असा सर्व पदव्या आल्या. पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना या पदाच्या भरतीसाठी पात्र ठरविण्यात यावे. प्रसंगी सेवा प्रवेश नियम बदलण्यास आम्ही तयार आहोत” असे असतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आडमुठे व मनमानी धोरण स्वीकारत जाहिरातीच्या शैक्षणिक अर्हता व अनुभव पात्रतेत बदल केला नाही. २५ जानेवारी २०२३ ची अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पत्रकारितेच्या पदव्युत्तर धारक विद्यार्थ्यांनी अर्ज, विनंत्या, तक्रारींच्या माध्यमातून उच्च शैक्षणिक अर्हता स्वीकारण्याची मागणी केली; मात्र मुदत संपली तरीही या काहीच कार्यवाही झाली नाही.

विद्यार्थ्यांच्या मागणींची दखल घेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते; मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष करत या पत्रांना केराची टोपली दाखवली. अशावेळेस विद्यार्थ्यांनी दाद कुठे मागावी ? अशी भावना सुखदेव माळी, राजेश पाटील, समाधान डोईफडे, गुणवंत कदम, संजीव अहिरे, मुकेश माळी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मनमानी कारभाराचा फटका खूद्द माहिती व जनसंपर्क विभागातील माहिती सहायक/उपसंपादक या पदांवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे ; कारण जाहिरातील अनुभव अर्हता नुसार माहिती सहायक/ उपसंपादक हे सुध्दा वरिष्ठ पदासाठी पात्र ठरणार नाहीत. याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने माहिती व जनसंपर्क विभागाला सुधारित सेवा प्रवेश नियम करण्याचे आदेश दिले असतांना माहिती विभागाकडून वेळकाढूपणा केला जात आहे‌. जाहिरात प्रसिद्ध होऊन तीन होऊन गेले तरी सुधारित सेवा प्रवेश नियम माहिती विभाग तयार करू शकले नाही. याबाबत विभागाने तकलादू भूमिका घेतली. सुधारित सेवा प्रवेश नियमात संदिग्धता न ठेवता स्पष्टपणे ‘पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी’ अशा उल्लेख करत नवीन सेवा नियमानुसार पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे‌.

जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ एप्रिल २०२३ पर्यंत दिलेल्या मुदतवाढीवर विद्यार्थी समाधानी नाहीत. कारण यात पदव्युत्तर पदवी चा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी पुन्हा या प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व माहिती व जनसंपर्क विभागाला काही प्रश्न आहेत.

– जाहिरात प्रसिध्द होऊन तीन महिने होऊन गेले तरी अद्याप सेवा प्रवेश नियम का बदलण्यात आले नाहीत?
– महाराष्ट्र लोकसेवा आयोगास भरती प्रक्रिया राबविण्याची घाई का झाली आहे?
– घटनेत दिलेला समानसंधीचा नियम डावलून भरती घेऊन लोकसेवा आयोगास काय साध्य करायचे आहे?
– सर्व पदवीधारकांना संधी न देता फक्त मोजक्याच लोकांच्या हितासाठी लोकसेवा आयोग काम करित आहे?
– मुख्यमंत्री व मुख्यमंत्री कार्यालय विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष करत आहे?
– सेवा प्रवेश नियम नव्याने सादर करण्याबाबत मॅट न्यायालयाचा निर्णय असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होत आहे?
– पत्रकारितेची ‘पदव्युत्तर पदवी’ या पदांसाठी ग्राह्य धरली जात नसेल तर आम्ही उच्च पदवीधारक सुशिक्षित बेरोजगांरानी आत्महत्या करायची का?

MPSC Recruitment Extension Students Trouble

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पठाणनंतर शाहरुख खान दिसणार या चित्रपटामध्ये

Next Post

मेहनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली; या तारखेला रंगणार १ तासाचा विशेष भाग (Video)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Appi

मेहनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली; या तारखेला रंगणार १ तासाचा विशेष भाग (Video)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011