मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आजा तब्बल 666 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे आयोगाच्या परीक्षा आयोजित केल्या जात नव्हत्या. आता मात्र त्या आयोजित होणार असल्याने स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तसेच, विधी व न्याय विभागाच्या आस्थापनेवरील सहायक विधी सल्लागार-नि-अवर सचिव संवर्गातील 3 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद परीक्षा आयोजनाचा वार ‘रविवार’ ऐवजी ‘शनिवार’ असा वाचावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/mpsc_office/status/1453613186192535552