महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
राज्य कर निरीक्षक पेपर-2 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
MPSC Exam Final Result Sheet Declare