मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, आता यापुढे विद्यार्थ्यांना कितीही वेळा एमपीएससीची परीक्षा देता येणार आहे. म्हणजेच, कमाल संधीची अट राहणार नाही. यासंदर्भातील निर्णय आयोगाने आज प्रसिद्ध केला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. या नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.
https://twitter.com/mpsc_office/status/1537036909964210176?s=20&t=gZih1c5sdLAa59vB1joCtw