मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहेत. यासंदर्भात विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. त्याची दखल अखेर राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेत निवेदन दिले आहे. त्यानुसार दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचएमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
MPSC Bed CET Exam on 21 August