मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज सकाळीच तरुणांना खुषखबर दिली आहे. खासकरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृह विभागातील सहायक सरकारी अभियोक्ता या पदाच्या तब्बल ५४७ जागांसाठी आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या पदासाठी तब्बल पावणे दोन लाख रुपयांचा पगारही मिळणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता तत्काळ अर्ज करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
https://twitter.com/mpsc_office/status/1479334813177823235?s=20