मुंबई – राज्यात परीक्षा घोळ सुरूच असून आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या २ जानेवारीची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्यात आरोग्य भरती, टीईटी परीक्षा, म्हाडा परीक्षा यांचा मोठा घोळ सुरू आहे. म्हाडाची परीक्षाही ऐन तोंडावरच रद्द करण्यात आली. आताही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. राज्य सरकारला साधी परीक्षाही घेता येत नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. १७ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार, वय अधिक ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी २ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली जात आहे, असे आयोगाने सांगितले आहे.
https://twitter.com/mpsc_office/status/1475790592068112387?s=20