मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने या वर्षी घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या परीक्षांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर एमपीएससीने परीक्षांच्या तारखा जाहिर केल्यानं उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता या परीक्षांची तयारी करता येणार आहे.










