नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय एम पी एल – महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग – स्पर्धेसाठी नाशिकच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार, प्रियांका घोडके ,रसिका शिंदे ,ऐश्वर्या वाघ व लक्ष्मी यादव , तेजस्विनी बाटवाल या सात महिला खेळाडूंचा एम पी एलच्या तीन संघांत समावेश झाला आहे.
टीम ब्ल्युची कर्णधार स्मृति मांधाना , टीम रेडची कर्णधार देविका वैद्य व टीम यलोची कर्णधार तेजल हसबनीस असे हे तीन संघ आहेत. या राज्यस्तरीय एमपीएल स्पर्धेतील निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.