जळगाव – चाळीसगाव आणि औरंगाबादला जोडणाऱ्या कन्नड घाटात सध्या धक्कादायक प्रकार सुरू आहे. यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनीच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे घाटातून जाणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूली केली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडूनच बिनदिक्कतपणे ही वसुली सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या सर्वप्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.
https://twitter.com/UnmeshPatilBjp/status/1462420332627693569