सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार तथा छत्रपतींचे वंशज असलेले उदयनराजे त्यांची स्टाइल, शाब्दीक फटकेबाजी आणि बिनधास्त स्वभाव यासाठी प्रसिद्ध आहेत. काहीसे कूल असलेले राजे कधी हॉट अर्थात गरम होतील याचा नेम नसतो. असाच एक प्रकार नुकताच घडला असून त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ते चांगलेच संतापले आहेत. पैसे खाल्ले आहेत, असे लोक म्हणत असतील तर मी मिशा काय भुवया पण काढून टाकेन. पुन्हा तोंड दाखवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे भाऊ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उत्तर देत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंवर हल्ला चढविला आहे. ते म्हणाले,‘माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करू. हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसं कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही.’
शिवेंद्रराजेंनी वाचला भ्रष्टाचाराचा पाढा
ज्यांच्या जीवावर यांनी संस्था स्थापन केल्या ते सर्वांना माहिती आहे. मला लाज वाटतेय सांगताना, बोलतानासुद्धा कमीपणा वाटतो. मला बोलू की नको असं झालंय, पण अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनी लोकांचे पैसे खाल्ले. दुर्दैवाने मला सांगावसं वाटतं की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? आमच्या दारात कधी कोण आलं नाही, आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत, असे शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.
MP Udayanraje Bhosale Angry and Big Announcement