सातारा – शासनाने संपूर्ण राज्यात वीकेंड लॅाकडाऊन घोषित केला होता. त्यात सुधारणा करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशा विरोधात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी १० एप्रिल रोजी साता-यात भीक मांगो आंदोलन केले होते. या आंदोलनातील रक्कम त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवली होती. पण, आज जिल्हा प्रशासनाने ही रक्कम त्यांना साभार परत केली आहे. ही रक्कम स्विकारता येत नाही असे पत्र जिल्हा प्रशासनाने देऊन हे पैसे घरी जाऊन परत केले. जिल्हा प्रशासनाने हे पैसे परत देण्याचे कारण देतांना सांगितले की, आंदोलनातील रोख रक्कम स्विकारता येत नाही. तशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने ती रक्कम परत करण्यात आली. ही रक्कम ४५० रुपये होती.