निलेश गौतम, सटाणा
हाती आलेली पिके गेली.पुढचे पिकनियोजन गेले पुढचे तीन वर्षे शेतीचे गणिते बिघडली आता करायचे काय आम्हीच हतबल झालो आमच्यातील ऊर्जा संपली किती दिवस आपत्तींना सामोरे जाययचे अशी आर्त हाक देत आज डांगसौंदाणेच्या शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली….
सोमवारी पश्चिम भागात झालेली गारपीट न भूतो न भविष्य अशीच होती गत 70 वर्ष्याच्या काळात आम्ही अशी गारपीट बघीतली नाही हे सांगताना वृद्ध शेतकरींच्या डोळ्यात पाणी आले. ऐन काढणी वर आलेला कांदा जमिनीतच खराब होणार आहे. लाखो रुपये खर्च करून लावलेली टोम्याटो, मिरची, कलिंगड पुर्णपणे नेस्तनाबूत झाले आहेत. आज गुरुवारी धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार सुभाष भामरे यांनी डांगसौंदाणे, निकवेल, दहिंदुले, जोरण भागातील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली.
यावेळी डांगसौंदाणे येथील सर्वाधिक नुकसान झालेले राजेंद्र परदेशी या युवा शेतकऱ्याच्या टोम्याटो व मिरची पिकाच्या झालेल्या शेतीची पाहणी खा भामरे यांनी केली या वेळी परदेशी यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत उच्यशिक्षित असुन ही शेतीची आवड असल्याने शेती करत असल्याचे सांगत 15 एकर शेतीवरील टोम्याटो, मिरची गारपिटीने नेस्तनाबुत झाले.
द्राक्ष शेतीची पुढील हंगामात फळधारणा होणार नाही असं सांगत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली तर गणेश देशमुख यांना ही आपल्या टोमॅटोची शेती दाखवताना रडु कोसळले गोविंद चिंचोरे या शेतकऱ्याने सर्वच शेतीची व्यथा मांडताना एकी कडे कवडीमोल भाव, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, तर एकीकडे बँकेत शेतकऱ्यांची घसरली पत याला सामोरे जातांना शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. जगायचे की मरायचे अस म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
यावर खा भामरे यांनी सर्वच शेतकऱ्यांना दिलासा देत सरसकट पंचनामे करून आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,यांच्याशी पत्रव्यवहार करून जिल्हाधिकारी यांचेशी बोलनार असल्याचे सांगत या भागातील लोकप्रतिनिधी शेतकरी व अधिकारी यांची बैठक घेणार असल्याचे सांगत सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या यावेळी बागलाण चे प्रांत अधिकारी बबन काकडे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, नायब तहसीलदार बहिरम, गटविकास अधिकारी पी एस कोल्हे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय देवरे अशोक गुंजाळ बाजार समिती संचालक संजय सोनवणे, उपसरपंच दिपक सोनवणे,सोपान सोनवणे यांचे सह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
MP Subhash Bhamre Satana Crop Loss Farmer Visit