मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशात एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून.अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. या अपघातासंदर्भात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह एसटी महामंडळाने हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येते तसेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचा उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.एसटी महामंडळाकडून दुपारी १.३१ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार ही माहिती प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.
अपघातस्थळी बचाव कार्य सुरू
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येवुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आहेत अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी १.५० मिनिटांनी घेतलेल्या माहितीनुसार प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
MP ST Bus Accident MSRTC Jalgaon Collector Helpline numbers