इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विख्यात कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये शिव महापुराण कथा व रुद्राक्ष वाटप महोत्सवाला सुरुवात झाली आहे. रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमात सुमारे दहा लाखाहून अधिक भाविकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे इंदूर-भोपाळ महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर सुमारे २० किलोमीटर वाहतूक कोंडी झाली आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातून आलेल्या ५२ वर्षीय मंगलबाई या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिहोर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दोन हजार लोक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान, दहाहून अधिक महिला बेपत्ता आहेत.
https://twitter.com/Anurag_Dwary/status/1626217422490603523?s=20
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाम येथे गुरुवारी रुद्राक्ष वाटप महोत्सवास सुरुवात झाली. शिव महापुराण कथाही सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनामुळे भोपाळ-इंदूर महामार्गावर २० किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी झाली आहे. कुबेरेश्वर धाम ते चौपाल सागर भोपाळच्या दिशेने लांबच्या लांब वाहनांच्या रांगा आहेत. एवढ्या प्रदीर्घ कोंडीनंतरही भाविक येण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोपाळ आणि इंदूर या दोन्ही ठिकाणांहून भाविक सतत कुबेरेश्वर धामला पोहोचत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही शुक्रवारी, दुपारी कुबेरेश्वर धामवर येऊ शकतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे १८ फेब्रुवारीला येथे येणार आहेत.
https://twitter.com/rohitlistner/status/1626228420974895105?s=20
रुद्राक्ष घेण्यासाठी दोन किमी लांब रांगा
रुद्राक्ष वितरणासाठी चाळीस काउंटर उभारण्यात आले आहेत. गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप एक दिवस आधी म्हणजेच बुधवारपासूनच सुरू झाले होते. पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक भाविकांना रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले आहे. गुरुवारी रुद्राक्ष दर्शनासाठी दोन किलोमीटर लांब रांग आहे. दोन लाखांहून अधिक भाविक रांगेत उभे असल्याचा अंदाज आहे. गर्दी रोखण्यासाठी बांबू आणि दोर लावून बॅरिकेड्स लावण्यात आले होते, जे गर्दी रोखण्यात अपयशी ठरत आहेत.
https://twitter.com/BagheliDurgesh/status/1626162291099201536?s=20
मोबाईल नेटवर्कही कोलमडले
कार्यक्रमाच्या एक दिवस आधी बुधवारी दोन लाखांहून अधिक लोक येथे पोहोचले. भाविकांची वाढती गर्दी पाहता कार्यक्रमस्थळी एक दिवसापूर्वीच भाविकांना रुद्राक्षाचे वाटप सुरू करण्यात आले. गुरुवारी आठ लाखांहून अधिक लोक पोहोचले आहेत.
भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलीस-प्रशासनाला बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल नेटवर्क कोलमडल्याने कुबेरेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. भाविक आप्तेष्टांपासून विभक्त होत आहेत.
https://twitter.com/ranjan_Bpl/status/1626202583751852035?s=20
MP Sihor Rudraksha Mahotsav Tremendous Devotees 1 Death