मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिउबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात खासदार राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राऊत म्हणाले की, नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का?सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
MP Sanjay Raut Reaction on Nashik FIR Booked