नवी दिल्ली – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान केला आहे. कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा ऑनलाईन होणार की प्रत्यक्ष याचा खुलासा त्यांनी आज येथे पत्रकार परिषद केला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे. कोरोनाचे नियम पाळून हा मेळावा साजरा केला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्या संदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे. गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला होता. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. धार्मिक स्थळे आणि शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष मेळावा घेण्यासंदर्भातील चाचपणी घेतली जात असून अंतिम निर्णय लवकरच जाहिर केला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.