मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील हुकूमशाही विरोधात लंडनमध्ये राहुल गांधींनी आवाज उठवला म्हणून त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यासाठी आम्ही आज सर्व दिल्लीत जात असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
राऊत पुढे म्हणाले की, याप्रकरणी राहुल गांधी माफी मागणार नाहीत. मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे. पण त्यांनी माफी का मागावी? भाजपमध्ये अनेक लोक आहेत की ज्यांनी विदेशात जाऊन देशाविरोधात विधान केले. त्यामुळे त्यांनी आधी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले होते की, केवळ आमचा माईक बंद केला जात नाही, तर तुरुंगात टाकले जाते. राऊत म्हणाले की, ते काय वावगे बोलले. ही काय लोकशाही आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला. या लोकशाहीला वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी आपली मते मांडली असेल तर त्यात चुकीचं केले असे वाटत नाही. यावेळी त्यांनी सध्या देशाचे कायदा मंत्रीच न्यायव्यवस्थेला धमक्या देत आहेत.
न्याय व्यवस्थेला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सरळ सरळ हुकूमशाही आहे. ज्या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले आणि कायदा मंत्री म्हणून त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता भाजपने रिजिजू सारखे लोकं बसवून न्याय यंत्रणेला धमकावले जात आहे. धमक्या देणारे हे सरकार आहे. यालाच हुकूमशाही म्हणतात, असेही ते म्हणाले.
MP Sanjay Raut on Rahul Gandhi Big Allegation BJP Union Government