मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच अतिशय गंभीर आरोप केला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयांचा सौदा असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. हा प्राथमिक आकडा आहे पण १०० टक्के खरे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात लवकरच मोठा खुलासा करणार आहे. देशाच्या इतिहासात कधीच असे घडलेले नसेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1627157588545777664?s=20
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच केला आहे. आयोगाने ७६ पानी आदेशात स्पष्ट केले आहे की, २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत जो बदल करण्यात आला तो आयोगाला कळविण्यात आलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी कॅव्हेटही दाखल करण्यात आले आहे. आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्या करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच आयोगाने निर्णय देण्याची घाई केल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1627172364122480641?s=20
MP Sanjay Raut on Name Symbol Crore Deal