नाशिक – नारायण राणे केंद्राचे मंत्री आहे त्यांची प्रकृती बरी नसते अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडता. त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशा शब्दात शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी राणे यांच्यावर नाशिकमध्ये टीका केली. यावेळी त्यांनी राणे यांना योगाची आवश्यकता आहे. उद्या पासून लाखो शिवसैनिक त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करेल, भाजपने देखील प्रार्थना करावी असा चिमटाही काढला. राणे यांच्यावरील कारवाई कायदेशीरच होती. कायद्यासमोर सर्व समान आहे असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, काही जण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काहीजण येड्याची जत्रा काढतात. नाशिकमध्ये डॅा. भारती पवार यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. ३६ मंत्र्यांनी शहाण्याप्रमाणे यात्रा काढली. फक्त अतिशहाणे ज्यांनी मोदींचा किंवा केंद्राचा प्रचार केला नाही. त्यांनी फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी यात्रा काढली. यावेळी नाशिकच्या भाजपच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात उध्दवजी आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचे नाते २५ वर्षाचे आहे. मात्र एका व्यक्ती मुळे हे नाते बिघडले आहे. नारायण राणे जे बोलताय ते देवेंद्र फडणवीस, पाटील, शेलार बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोकणात तुमचा कितीदा पराभव झाला हे बघावे, सेना व्यक्तीमुळे नाही बाळासाहेबांच्या विचारामुळे आहे. असेही त्यांनी सांगितले,
मी आश्रय दिला नाही
मी देखील खासदार आहे मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोंडत नाही. नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांना मी आश्रय दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना मी लगेच पोलिसांसमोर हजर राहायला लावले. दरम्यान त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.
पोलिस आयुक्तांची भेट
खा. संजय राऊत यांनी आज नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांची भेट घेतली. याभेटीबाबत बोलतांना खा. राऊत यांनी सांगितले की, पोलिस आयुक्तांना मी आज ओळखत नाही आमचं कौटुंबिक नात आहे.