नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार संभाजीराजे छत्रपती हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या कारचे सारथ्य एका युवतीने केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या की ही युवती आहे तरी कोण. नाशिक दौऱ्यात खासदार संभाजीराजे हे नाशिकरोडला आले. त्यावेळी ते खासदार हेमंत गोडसे यांच्या निवासस्थानी जात होते. त्याचवेळी ते ज्या कारमध्ये बसले होते ती कार एक युवती चालवित होती. ही युवती म्हणजे खासदार हेमंत गोडसे यांची स्नुषा भक्ती गोडसे असल्याचे स्पष्ट झाले. भक्ती या कार चालवित असून त्यांच्या शेजारच्या सीटवर खासदार संभाजीराजे बसल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ उपस्थितांनी काढला आणि तो चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार संभाजीराजे हे घरी येत असल्याने त्यांना घेण्यासाठी स्वतः भक्ती गोडसे या आल्या होत्या. खासदार गोडसे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी खासदार संभाजीराजे आले. मात्र, त्यांच्या कारचे हे सारथ्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. बघा हा व्हिडिओ