नाशिक – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन २१ जून रोजी नाशिक येथे होणार आहे.आंदोलनासाठी संभाजीराजे छत्रपती हे स्वतः उपस्थित राहणार आहे. त्या संदर्भातल्या कार्यक्रमाची रूपरेषा नियोजन करण्यासाठी शुक्रवार दिनांक १८ जून रोजी दुपारी १०.३० वरद लक्ष्मी नांदूर नाका येथे बैठक आयोजित केली असल्याची पोस्ट मराठी क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे टाकण्यात आली आहे. उद्या या बैठकीत मोर्चाचे नियोजन केले जाणार आहे.