अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मुलीच्या अपहरणावरुन खासदार नवनीत राणा आणखी अडचणीत आल्या आहेत. येथील एका मुलीचे विशिष्ट धर्मीय मुलाने अपहरण केले असून, लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला होता. आता मात्र, त्या तरुणाने पोलिसात तक्रार दिली आहे की त्याला राणा कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी ‘माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्हे वाढवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्या तरुणाच्या वडिलांनी केली आहे. तर, पीडित तरुणही पोलीस ठाण्यात पोहोचला. माझ्या जीवाला धोका असल्याचे त्यानेही म्हटले आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध स्थानिक राजापेठ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत येथील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खा. राणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी त्याला दुजोरा दिला. मात्र, हे अदखलपात्र गुन्हे दाखल करण्याऐवजी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी विशिष्ट धर्मीय मुलाच्या वडिलांनी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. राणा यांच्या निवेदनामुळे माझ्या मुलाची तथा कुटुंबाची नाहक बदनामी झाली, तथा त्याला पाहून घेण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे तो घराबाहेर पडण्याची हिंमत गमावून बसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्या मुलीचा आपल्या मुलाशी दुरान्वये संबंध नसताना खासदार राणा यांनी त्याला कडकपणे विचारा, त्याच्याशी साधेपणाने वागू नका, अशी सूचना राणा यांनी पोलिसांना केल्याने आपला मुलगा प्रचंड दबावात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे, माझ्या मुलासह कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही या कुटुंबीयाने म्हटले आहे.
राजापेठ पोलिसांनी त्या मुलीच्या अपहरण प्रकरणी एका विशिष्ट धर्मीय मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच मुलाने त्या मुलीला लव्ह जिहादसाठी पळवून लावल्याचा आरोप लावण्यात आला. वास्तविक रागाच्या घरात बाहेर पडली तरुणी खासदार राणा यांनी देखील त्या मुलाची अधिक चौकशी करण्याची आग्रही मागणी पोलिसांकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र आपले कुणीही अपहरण केले नाही. आपण स्वत:हून रागाच्या भरात एकटेच घराबाहेर पडलो, अशी स्पष्टोक्ती तिने दिली. तथा आपली बदनामी थांबवावी, असे आवाहन खासदार राणा यांना केले होते. त्यामुळे हा वाद कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत आहे.
MP Navneet Rana Threat Victim Youth Complaint
Amravati Love Jihad