इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील इंदूरच्या बीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड फार्मसीचे प्राचार्य विमुक्ता शर्मा यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याने त्यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. विमुक्ता शर्मा यांचे आज, पहाटे ४ वाजता चोइथराम रुग्णालयात निधन झाले.
जिल्हाधिकारी डॉ. इलैयाराजा टी यांनी आरोपी विद्यार्थी आशुतोष श्रीवास्तववर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी प्रकरणांच्या माहितीसह पोलिसांनी रासुकाचा प्रस्ताव पाठवला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शशिकांत कनकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष श्रीवास्तव (विजयश्री नगर, कालणी नगर) याला शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात (महू) येथे हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी करून दुपारी त्याला घटनास्थळी नेले. घटनेचे नाट्यमय रुपांतर करून आशुतोषने विमुक्ता यांच्यावर पेट्रोल ओतले. या गुन्ह्यात त्याने वापरलेले लायटर, दुचाकी आणि बादली पोलिसांनी जप्त केली आहे.
तपास अधिकारी आरएनएस भदौरिया यांनी आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळ आणि विविध ठिकाणी नेऊन गुन्ह्याची खात्री केली. खंडवा रोडवरील पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला ओळखले आहे. पंपाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले आहे. यानंतर आरोपी आशुतोष हा दुकानात गेला आणि तेथे त्याने ५० रुपये किमतीची बादली विकत घेतली.
दुसरीकडे आमदार रमेश मंडोला, सर्व ब्राह्मण युवा संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी, नगरसेवक मनोज मिश्रा यांनी चोईथराम रुग्णालयात प्राचार्य विमुक्ता यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. आयजी राकेश गुप्ता यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. ओळखल्या गेलेल्या गुन्ह्यांचा समावेश करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
MP Indore Crime Petrol Fire Burn Principle Death