नाशिक – शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेवून भविष्यातील अपघातांना आळा बसावा, वाहतुकीची कोंडी होवू नये, संभाव्य वाहतुकीच्या कोडीमुळे शहरवासीयाना मनस्ताप होवू नये, दररोज शहरात येणारे शेतकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार यांची कुंचबना होवू नये यासाठी सुरत-चेन्नई महामार्गाचे नियोजन करण्यासाठी आत्तापासूनच विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत मनपा हद्दीतून जाणा-या या महामार्गाचा डीपीआर तात्रिकदृष्टया बिनचूक तयार करण्याच्या सुचना खा गोडसे यांनी प्रशासनला दिल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या गिरणारे फाटया जवळील जकात नाका ते भुजबळ नॉलेज सिटी या उड्डाणपूल उभारणीत अनेक त्रुटी राहिल्याने त्यात नंतर अनेक बदल करणे भाग पडले. के.के.वाघ कॉलेज ते आडगाव शिवार पर्यंत महामार्गावर पुन्हा नव्याने उड्डाणपूलाचे काम तसेच सर्विसरोड आणि रस्त्यालगत मो-या, महामार्गावर वाहनांना चढउतार करण्यासाठी रॅम्प, कठडे तयार करावे लागले. यासंबंधित कार्य सध्या सुरू असल्याने आडगाव नाका ते आडगाव दरम्यानच्या महामार्गावरील वाहतुक एक वर्षापासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची पुनरावृत्ती सुरत – चेन्नई महामार्गाची उभारणी करतांना होवू नये यासाठीच्या नियोजनासाठी नुकतेच खासदार गोडसे यांच्या कार्यालयात संबंधित अधिका – यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नॅशनल हायवे विभागाचे दिलीप पाटील, श्री साळुके, शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक नरेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मनपा हद्दीतून जाणा-या सुरत-चेन्नई महामार्ग उभारणीत कोणतेही तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणी महामार्ग मुंबई-आग्रा महामार्ग (NH-3) ला कॉस होत आहे तेथे बटरफ्लाय कॉसिंग इंटरचेंज प्रस्तावित करण्यात यावा, ज्या ठिकाणी महामार्ग ३० मी, २४ मी, १८ मी रूंद मंजूर डीपी रस्त्यांना कॉस होत असेल त्या ठिकाणी डीपी रस्त्याच्या रूंदीचा वेहिक्युलर अण्डर पास (व्हीयु.पी) प्रस्तावित करण्यात यावा, महामार्गाची भूसंपादनाची रूंदी नाशिक मनपा हद्दीत ७० मी ऐवजी ९० मी प्रस्तावित करून नाशिक मनपा हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूस १०मी–१०मी चे सर्विस रस्ते प्रस्तावित करण्यात यावेत, प्रस्तावित महामार्ग शक्यतो नाशिक मनपाच्या मंजूर विकास आराखडयातील ३६ मी व ६० मी बाहय रिंग रस्त्याने घ्यावा अशा सुचना खासदार गोडसे यांनी प्रशासनाला दिल्या. सुरत-चेन्नई महामार्गावर वरील सोयीसुविधा आणि यंत्रणा उभारणीसाठी आत्तापासूनच मायक्रो प्लानिंग करणे गरजेचे असल्याचे सुचना यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले. याकामी तंज्ञांसोबत सोबत लवकरच विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.